डेन्मार्क व स्वीडन दरम्यानचा ओरेसंड पूल - अभियांत्रिकी व वास्तुस्थापत्य क्षेत्रातील एक कमाल
२०१५ च्या जून महिन्यात कामानिमित्त्य स्वीडनला जाण्याचा योग आला .तिथला मुक्काम तीनच आठवडे असल्यामुळे सपत्निक जाण्याचे ठरविले. स्वीडन म्हणजे जगातल्या संपन्न , समृद्ध आणि शांत देशांपैकी एक . उत्तर ध्रुवाजवळ असलेल्या या स्कॅंडेनेवियन देशात गेल्यावर डोळ्याचे पारणे फेडणारी अनेक ठिकाणं आपल्याला बघायला मिळणार याची खात्री होती.
आधी मुंबई ते पॅरिस आणि नंतर पॅरिस ते कोपनहेगन असा विमान प्रवास करून आम्ही कोपनहेगन विमानतळावर पोचल्यानंतर डेन्मार्क व स्वीडन यांच्यामधल्या ८ किलोमीटर समुद्रावर पूल बांधून बनविलेल्या व सुमारे ४ किलोमीटर समुद्राखालून भुयार बनवून बांधलेल्या ओरेसंड मार्गावरून मेट्रो पकडून स्वीडनच्या माल्मो शहरात दाखल झालो . जगातल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय पूलांपैकी असणाऱ्या - डेन्मार्क व स्वीडन दरम्यानच्या ओरेसंड सामुद्रधुनी वर असलेल्या या पूलाबद्ल आधीपासूनच बरेच कुतूहल होते .त्याबद्दल थोडक्यात माहिती करून देण्याचा हा प्रयत्न .
या दोन देशांना पुलाद्यारे जोडण्याची योजना तशी फार जुनी म्हणजे १९३६ सालातली . त्याकाळच्या काही नामवंत बांधकाम कंपन्यांनी त्यावेळी सरकारकडे अशाप्रकारचा महाकाय समुद्री पूल बांधण्याची योजना मंडळी होती . पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ती योजना पारच बारगाळली गेली . पुढे अनेकदा या ना त्या कारणाने हा मुद्दा स्वीडन व डेन्मार्क या देशांच्या सरकारांमध्ये चर्चेत येत राहिला .. १९७३ साली या प्रश्नाने उचल देखील खाल्लेली परंतु सादर देशांपुढील आर्थिक परिस्थितीमुळे पुन्हा १९७८ साली हि योजना रद्द करावी लागली . कालांतराने हळूहळू गोष्टी सकारात्मक होत गेल्या व १९९५ साली सुरु झालेले हे महाकाय बांधकाम सुमारे पाच वर्षांनी पूर्ण होऊन १ जून २००० साली हा पूल व भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला .
२००० साली बांधून पूर्ण झालेला हा मार्ग अभियांत्रिकी व वास्तुस्थापत्य क्षेत्रातील एक कमाल म्हणता येईल . दोन देशांच्या मधोमध असणाऱ्या एका छोट्याश्या बेटाचा आधार घेऊन हा मार्ग बनविण्यात आला .डेन्मार्क मधील कोपनहेगन ते या बेटापर्यंत केबल वापरून बनवलेला पूल अगदी आपल्या वांद्रे-वरळी सी लिंक सारखाच दिसतो . या बेटापासून स्वीडनच्या माल्मो शहरापर्यंतचा मार्ग पूर्णतः भुयारी असून समुद्राच्या खाली असणाऱ्या भूभागातून तो जातो .अवाढव्य पूल व समुद्राखालचे भुयार या दोन्ही गोष्टी बनवताना अंदाजे २.६ बिलियन युरो म्हणजे सुमारे २० हजार करोड रुपये इतका खर्च आला . याशिवाय तो बनवायला लागलेली प्रचंड मेहनत , पुलाच्या मधले भाग बसवायला लागलेल्या तरंगत्या राक्षसी क्रेन्स , भुयार खोदण्यासाठी लागलेले अद्यावत तंत्र व मोठमोठया मशिन्स हे सगळंच अद्भुत होतं . बांधकाम होतं असतानाचे व्हिडीओ यू ट्यूबवर उपलब्ध आहेत .

आजघडीला स्वीडन व डेन्मार्क या शेजारीज देशातील वाहतूक अत्यंत सोपी व जलद होऊ शकली ती या अचाट बांधकामामुळेच .यावरून एकाचवेळी खालून रेल्वे व वरून मोटार गाड्या जाऊ शकतील अश्या प्रकारची व्यवस्था असणाऱ्या या मार्गावरून हजारो लोकं दररोज ये जा करत असतात. अर्थात यासाठी वाहनचालकांना टोल सुद्धा मजबूत भरायला लागतो . पुलाची उंची मुद्दामून जास्त म्हणजे २०४ मीटर ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून मोठमोठी जहाजं पुलाच्या खालून सहज जाऊ शकतील .
या पुलावरून दिवस उजेडी जाताना , खास करून रेल्वेतून जात असताना खूप भन्नाट वाटतं . खिडकीतून दोन्ही बाजूंना अथांग समुद्र दिसत असतो व आपण त्यावरून तरंगत जातोय असा भास होतो . पुलाच्या आजूबाजूंना असलेल्या पवनचक्क्या व दोन्ही बाजूंना लांबवर दिसणारे डेन्मार्क व स्वीडन देशांचे किनारे तुमची सफर आणखीनच प्रेक्षणीय बनवतात . कधी यूरोपात डेन्मार्कला व स्वीडनला जाण्याच्या योग आला तर माल्मो ते कोपनहेगन हा प्रवासाची मजा या पूलावरून आवर्जून घ्यावी .
--- ©Advait Khatavkar
आधी मुंबई ते पॅरिस आणि नंतर पॅरिस ते कोपनहेगन असा विमान प्रवास करून आम्ही कोपनहेगन विमानतळावर पोचल्यानंतर डेन्मार्क व स्वीडन यांच्यामधल्या ८ किलोमीटर समुद्रावर पूल बांधून बनविलेल्या व सुमारे ४ किलोमीटर समुद्राखालून भुयार बनवून बांधलेल्या ओरेसंड मार्गावरून मेट्रो पकडून स्वीडनच्या माल्मो शहरात दाखल झालो . जगातल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय पूलांपैकी असणाऱ्या - डेन्मार्क व स्वीडन दरम्यानच्या ओरेसंड सामुद्रधुनी वर असलेल्या या पूलाबद्ल आधीपासूनच बरेच कुतूहल होते .त्याबद्दल थोडक्यात माहिती करून देण्याचा हा प्रयत्न .
या दोन देशांना पुलाद्यारे जोडण्याची योजना तशी फार जुनी म्हणजे १९३६ सालातली . त्याकाळच्या काही नामवंत बांधकाम कंपन्यांनी त्यावेळी सरकारकडे अशाप्रकारचा महाकाय समुद्री पूल बांधण्याची योजना मंडळी होती . पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ती योजना पारच बारगाळली गेली . पुढे अनेकदा या ना त्या कारणाने हा मुद्दा स्वीडन व डेन्मार्क या देशांच्या सरकारांमध्ये चर्चेत येत राहिला .. १९७३ साली या प्रश्नाने उचल देखील खाल्लेली परंतु सादर देशांपुढील आर्थिक परिस्थितीमुळे पुन्हा १९७८ साली हि योजना रद्द करावी लागली . कालांतराने हळूहळू गोष्टी सकारात्मक होत गेल्या व १९९५ साली सुरु झालेले हे महाकाय बांधकाम सुमारे पाच वर्षांनी पूर्ण होऊन १ जून २००० साली हा पूल व भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला .
डेन्मार्क व स्वीडन दरम्यानचे छोटेसे बेट व बेटापासून डेन्मार्क च्या मुख्य भूमीशी जोडल्या गेलेला पूल . या बेटापासून स्वीडनपर्यंतचा मार्ग समुद्राखालून बनवलेल्या भुयारातून जातो .
२००० साली बांधून पूर्ण झालेला हा मार्ग अभियांत्रिकी व वास्तुस्थापत्य क्षेत्रातील एक कमाल म्हणता येईल . दोन देशांच्या मधोमध असणाऱ्या एका छोट्याश्या बेटाचा आधार घेऊन हा मार्ग बनविण्यात आला .डेन्मार्क मधील कोपनहेगन ते या बेटापर्यंत केबल वापरून बनवलेला पूल अगदी आपल्या वांद्रे-वरळी सी लिंक सारखाच दिसतो . या बेटापासून स्वीडनच्या माल्मो शहरापर्यंतचा मार्ग पूर्णतः भुयारी असून समुद्राच्या खाली असणाऱ्या भूभागातून तो जातो .अवाढव्य पूल व समुद्राखालचे भुयार या दोन्ही गोष्टी बनवताना अंदाजे २.६ बिलियन युरो म्हणजे सुमारे २० हजार करोड रुपये इतका खर्च आला . याशिवाय तो बनवायला लागलेली प्रचंड मेहनत , पुलाच्या मधले भाग बसवायला लागलेल्या तरंगत्या राक्षसी क्रेन्स , भुयार खोदण्यासाठी लागलेले अद्यावत तंत्र व मोठमोठया मशिन्स हे सगळंच अद्भुत होतं . बांधकाम होतं असतानाचे व्हिडीओ यू ट्यूबवर उपलब्ध आहेत .

वरील सर्व छायाचित्रे साभार - इंटरनेट
आजघडीला स्वीडन व डेन्मार्क या शेजारीज देशातील वाहतूक अत्यंत सोपी व जलद होऊ शकली ती या अचाट बांधकामामुळेच .यावरून एकाचवेळी खालून रेल्वे व वरून मोटार गाड्या जाऊ शकतील अश्या प्रकारची व्यवस्था असणाऱ्या या मार्गावरून हजारो लोकं दररोज ये जा करत असतात. अर्थात यासाठी वाहनचालकांना टोल सुद्धा मजबूत भरायला लागतो . पुलाची उंची मुद्दामून जास्त म्हणजे २०४ मीटर ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून मोठमोठी जहाजं पुलाच्या खालून सहज जाऊ शकतील .
पुलावरून कोपेनहेगनला जात असताना रेल्वेतून काढलेला फोटो
--- ©Advait Khatavkar