200 मीटर ते 200 किलोमीटर - माझे कॉलेज पर्यंतचे सायकलींग चे किस्से
काही गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्या ध्यानीमनी नसताना नकळत येतात , पुढे त्या गोष्टी हळूहळू आवडू लागतात -त्याची गोडी वाढू लागते . त्या गोष्टींबद्दल विस्मयकारक / अद्भुत घटना घडतात त्या गोष्टीचा छंद जडतो व कालांतराने तुमच्या आयुष्याचा भाग बनून जातात .सायकल आणि सायकलिंग बाबत माझ्या आयुष्यात काहीसं असंच झालंय.
माझ्या आयुष्यात सायकल नेमकी कधी आली ते मला स्वतःला आठवत सुद्धा नाही . काहीही न कळण्याच्या वयात माझ्यासाठी आई बाबांनी तीन चाकी सायकल आणलेली . २७-२८ वर्षांपूर्वीचे जुने फोटो बघितल्यावर काही फोटोंमध्ये मी तीनचाकी सायकलवर बसलेलो दिसतोय .आम्ही पुण्याजवळ देलवडीला होतो त्यावेळी त्या सायकलसकट एकदा जिन्यावरून खाली गडगडत आल्याचे पुसटसं आठवतं .
देलवडीला असतानाचा माझ्या पहिल्या सायकल बरोबरचा फोटो . वय वर्ष ३-४ .
वयाच्या साधारण तिसऱ्या वर्षी म्हणजे चड्डी घालायची अक्कल नव्हती त्याकाळी एक लाल रंगाची सायकल माझ्याकडे होती. ती सायकल पुढे काही वर्ष मी चालवत असलो पाहिजे कारण सावंतवाडीला बालवाडीत असताना एका सायकल स्पर्धेत पोडियम मारल्याचे मला चांगलेच आठवतेय . त्या रेसचा फोटो बघून तर काही आठवणी ताज्या होतात . स्पर्धेच्या आधी कमरेच्या खाली एक गळू ( Boil ) झालेलं होतं बहुदा आईने त्याला ड्रेसिंग करून दिलेलं .बसायला काय चड्डी घालायलासुद्धा त्रास होतं होता .आणि अश्यातच तीन चाकी सायकलच्या स्पर्धेत उतरलेलो. माझी सायकल डबलसीट वाली होती , नीटसं आठवत नाही पण बहुदा वजन नको म्हणून मागची सीट काढून ठेवली असणार किंवा मी तोडून टाकली असणार . स्पर्धेच्या दिवशी सकाळी सावंतवाडीच्या मुख्य बाजारात श्रीकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस ते काणेकरांच्या लाकडी खेळण्याच्या दुकानाच्या मधल्या भागात स्पर्धकांसाठी चुन्याने लेन बनवल्या होत्या ( लहानपणी बालवाडी -पहिली -दुसरी अशी तीनच वर्ष सावंतवाडीत होतो पण जवळजवळ सगळे रस्ते व ठराविक ठिकाणं अजूनही डोक्यात फिट्ट बसलेले आहेत त्यामुळे आजही त्या घटना रस्ते व जागांसकट आठवतात ) प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या लेन मधून सायकल चालवायची होती . मला रस्त्याच्या सर्वात उजवीकडची अगदी नालीच्या शेजारजी लेन दिलेली होती ..शेजारीच नाली असल्याने आपण सायकल पळवण्याच्या नादात त्यात पडू की काय अशी भीती त्यावेळी वाटल्याचे मला अजूनही चांगलंच आठवतंय . नशिबाने माझ्या शेजारचा स्पर्धक नव्हता आला , त्यामुळे मला शेवटून दुसऱ्या लेन मध्ये ठेवण्यात आले . नक्की अंतर माहिती नाही पण अंदाजे २०० मीटरची ती छोट्या मुलांसाठीची सायकल स्पर्धा होती .
आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या सायकल स्पर्धेत मी (चट्ट्यापट्ट्याचा टीशर्ट) आणि माझा सगळ्यात जुना मित्र हर्षल (लाल शर्ट) आपापल्या सायकली हाणताना
स्पर्धा सुरु झाल्यानंतर तिसऱ्या का चौथ्या मिनिटाला मी अंतिम रेषेच्या पलीकडे होतो . माझा मित्र हर्षल कुलकर्णी त्याची आकाशी रंगाची सायकल हाणत माझ्यापेक्षा काही सेकंद आधी पोचला होता .व माझा दुसरा नंबर आलेला . ती माझ्या आयुष्यातली पहिलीवहिली सायकल रेस . गळू ठणकत असताना पूर्ण केलेली . नंतर चड्डी खाली घसरत असताना पोलीस काकांकडून घेतलेले दुसऱ्या नंबरचे बक्षीस सुद्धा चांगले आठवतेय . (नशीब फोटो काही सेकंद आधी घेतला गेलाय 😁 ) .
पोलीस काकांकडून दुसऱ्या नंबरचे बक्षीस घेताना पोडियम फिनिशर मी 😁
मी दुसरीत असताना आम्ही सावंतवाडी सोडली त्यानंतर ती सायकल कुठे गेली ते आता आठवत नाही . पुसदला आल्यावर गजानन मंदिराच्या समोर राहायला असताना शेजारचे व शाळेतले असे खूप जण मित्र मैत्रिणी म्हणून मिळाले . त्यापैकी काही जण आमच्यापेक्षा वयानी ३-४ वर्षांनी मोठे सुद्धा होते . त्यातले काही जण भाड्याच्या सायकली तासाने चालवायला आणायचे . सायकलवाल्याकडे काही माध्यम आकाराच्या व काही लहान सायकली होत्या . त्यांना बघितल्यावर आपणही सायकल चालवावी असे वाटायचे पण दोनचाकी सायकल येत नव्हती .दोन- चार वेळा आईकडून ५० पैसे घेऊन छोटी सायकल शिकायला म्हणून आणली . शेजारची रिता ताई आणि एक दोन मोठे मित्र मागे धरून चालवायला शिकवायचे . कधी कधी त्यांच्या मोठ्या सायकलवरपण त्यांच्या मदतीने शिकण्याचा प्रयत्न करून झाला पण सायकल काही स्वतःची स्वतः सुटी चालवता येत नव्हती . हे सगळं करताना बरेचदा कोपरं गुढघे फोडून पण घेतलेले .
एकदा मात्र एक विलक्षण घटना घडली ... रात्री झोपेत एक स्वप्न पडलं .. स्वप्नात मी सायकल चालवायला शिकत होतो , रिता ताईने अचानक माझी सायकल सोडून दिलेली आणि मी त्याची पर्वा न करता न धडपडता स्वतः ची स्वतः व्यवस्थित सायकल चालवत होतो ... मी सायकल चालवायला शिकलो होतो . जाग आली तेव्हा दरदरून घाम फुटला होता , आपण ग्राउंडवर सायकल चालवतोय का घरात झोपलो आहे ते कळेना . आजूबाजूला बघितल्यावर ते स्वप्न होतं याची खात्री पटली पण मनात चलबिचल होताच होती . ते फक्त एक स्वप्न होतं का कसली अनुभूती होती हे कळायचं वय नव्हतं पण काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं होत असल्याची जाणीव होत होती . दुसऱ्या दिवशी बहुदा सुट्टीचा दिवस होता . सकाळी सकाळी आईकडून पैसे घेऊन एकट्याने सायकलवल्याचे दुकान गाठले व एक छोटी सायकल घेतली . रात्रीच्या स्वप्नाने एक जबरदस्त आत्मविश्वास दिलेला. ते स्वप्न होतं हे पूर्णपणे माहिती असूनसुद्धा आपण काहीतरी केलं तर तोंडावर आपटू अशी अजिबात भीती वाटली नाही . एकट्यानेच सायकलवर टांग मारली व चालवायला सुरुवात केली ...सायकल पुढे जायला लागली व हळूहळू तोल सांभाळत मी ती काळजीपूर्वक रस्त्यावर चालवायला लागलो . काय गम्मत झालेली काय माहिती पण अश्याप्रकारे अक्षरशः एका रात्रीतून मी अचानक सायकल चालवायला शिकलो होतो . म्हटलं तर चमत्कार , म्हटलं तर मानसशास्त्र किंवा आणखी काही . कदाचित आधीचे काही दिवस सायकल शिकण्यासाठी केलेले प्रयत्न व इतर मोठ्या मित्र-मत्रिणींनी केलेली मदत ही तोफेत भरलेला दारुगोळा होता व त्या स्वप्नानी त्याला बत्ती देण्याचे काम केले असावे . त्या दिवशी घरून आणखी पैसे घेऊन पुढचे काही तास मी पुसदच्या शंकर नगर व मोती नगरच्या रस्त्यांवर सायकल फिरवत होतो . एखाद्या पक्षाच्या पिल्लाने पडत पडत अचानक उडणे शिकल्यानंतर उंच भरारी घेतल्यानंतर त्याला जसं वाटत असेल अगदी तीच अवस्था माझी झालेली होती. घरच्यांना आणि मित्र मैत्रीणींना पण असं अचानक काय झालं याचं आश्चर्य वाटत असणार .
यानंतर अनेकदा भाड्याची सायकल घेऊन जवळपास फिरणं व्हायचं . पाचवीला गेल्यावर आई-बाबांनी ऍटलासची सायकल घेऊन दिलेली. रोज शाळेत त्यावरच जाणे होई . एकदा त्या सायकलवर केलेला स्टंट व्यवस्थित आठवतो ... पाचवीला होतो .नुकतीच सायकल घेतली होती . एका रविवारी एकटाच सायकलवर बोंबलत फिरत असताना आसेगावकर शाळेशेजारचं उंच टेकाड दिसलं . आधी बरेचदा त्या टेकाडावर खेळायला म्हणून आम्ही जात असू . त्यावर सायकल चढवून नेली तर खाली जोरात येताना काय मज्जा येईल ---असं म्हणून त्यावर सायकल हातात घेऊन चढवली बऱ्यापैकी तीव्र चढ असल्यामुळे धापा टाकत कसंबसं वर पोचलो. त्या टेकाडावर जायला खरंतर रास्ता अथवा पायवाट अशी नव्हतीच , सगळा मामला ओबडधोबडच होता . खाली येण्यापूर्वी त्यातल्यात्यात बरा पट्टा बघितला .तिथे काही बकऱ्या चरत होत्या . वरून सायकल येत असताना त्या बाजूला होतील असा विचार करून मी सायकलवर बसलो व सायकलसकट स्वतःला उतारावर सोडून दिलं . भयंकर वेगाने येणारी सायकल आणि त्यावर बसून ओरडत खाली येणाऱ्या मला बघूनसुद्धा ती बकरी काही ढिम्म हालली नाही .त्या वेगात सायकल नियंत्रणात आणणं अथवा दिशा बदलणं अशक्य होतं . मी त्याच वेगात सरळ त्या बकरीला जाऊन ठोकलो .. सायकल सकट मी हवेत गिरकी घेतलेली मला आठवतेय ..... आणि त्यानंतर दाणकन आपटल्याचा आवाज उडालेली धूळ आणि ओरडणारी बकरी एव्हढाच आठवतंय .काय झालंय हे कळायला व आपण जिवंत आहोत हे समजायला काही सेकंद लागले . दुपारची वेळ असल्यानं जवळपास कुणीही नव्हतं . आपल्याला नेमकं कुठेकुठे लागलंय - सायकलचं काय काय तुटलंय - ती बकरी जिवंत आहे का ? हे सगळं याचं क्रमाने तपासलं . मुरमाड जमिनीवर वेगाने घासल्या गेल्यामुळे मला बऱ्यापैकी लागलेलं होतं ...सायकल साधी असल्याने सायकलचे काही नट निघालेले . बकरीसुद्धा जिवंत होती व पलीकडे जाऊन चरत होती .मळालेल्या कपड्यांनी , खरचटलेल्या अंगानी व तुटलेली सायकल हातात घेऊन तडक घरी गेलेलो . हा माझ्या आयुष्यातल्या पहिलाच डाऊनहीलिंग सायकलींगचा अनुभव - आयुष्यभर लक्षात राहणारा . त्यानंतर बरेचदा MTB वर डाऊनहीलिंग केलं पण इतकं बेक्कार कधीही आपटलो नाही .
नववीला असताना हिरोची डेव्हिल मिळाली . ती चंदेरी रंगाची दणकट असलेली MTB सायकल मला जाम आवडायची . त्यावर पुसद व पुसदच्या आजूबाजूला खूप फिरल्याचे आठवतंय . आमचे पुसदचे घर जरा गावाच्या एका टोकाला होतं . तिथून बाहेरगावी जाण्यासाठी ३ वेगवेगळे रस्ते होते . कधी कार्ला रस्त्याने छोटासा घाट चालून वर तर कधी सांडवा -मांडवा रस्त्याने डोंगराळ भागात दूर इसापूर धरणापर्यंत पर्यंत एकट्यानेच जाणं होतं असे . दहावीला असताना पुसदला एक 25 किलोमीटरची छोटीशी सायकल रेस झालेली त्यात खुल्या गटात भाग घेऊन रेसिंगचा थरार अनुभवलेला . अकरावी बारावीला असताना ३५-४० किलोमीटर केल्यानंतर सायकलिंगची वेगळीच मजा अनुभवायला शिकलो .या दरम्यान दिग्रसला जाताना लागणार घाट , खंडाळा घाट , पूस धरण अश्या अनेक राइड्स कधी मित्रांबरोबर तर कधी एकट्याने झाल्या .एकदा मातोश्रींबरोबर इसापूर धरणावर सायकलवर गेलेलो .मातोश्रींनी त्या वयात डोंगराळ भाग बिना गियरच्या लोखंडी सायकलवर कडक उन्हात चढून कमाल केलेली .
एकदा काही मित्रांना घेऊन जंगल सफारीसाठी सायकलवर खंडाळ्याच्या जंगलात बरेच पुढे गेलेलो ( हा विदर्भातला पुसद जवळचा खंडाळ्याचा घाट बरं का ) .जाताना रस्तावर नीलगाय दिसलेली तर जंगलात थोडं आतमध्ये रानडुकरांची टोळी दिसलेली . पार वाशीम जिल्याची सीमा ओलांडूनच परत आलेलो आम्ही त्यावेळी .
अशीच एक खंडाळ्याची रपेट चांगलीच लक्षात राहण्याजोगी - अकरावीला असताना लेक्चर बुडवून अमित आणि सुमित या अतरंगी -अवकाळी मित्रांबरोबर सायकलवर खंडाळ्याचा घाट गाठला . सायकली रस्त्यावर लावून आम्ही बरेच आतमध्ये जंगलात फिरायला म्हणून गेलो . मागच्या बाजूला खाली दिसणारं एक सुंदर तळे बघून परत येत होतो . पानगळीचा ऋतू असल्याने व संपूर्ण जंगल सागवानाची असल्याने जंगलातल्या झाडांची सुमारे ८० टक्के पाने वळून खाली पडलेली होती . ती पाने तुडवत चालताना कचर कचर आवाज होत होता .. काहीठिकाणी तर पाय गुडघ्यापर्यंत आत पानांमध्ये जात होता . अश्यात अम्याला काय दुर्बुद्धी सुचली काय माहित - लेकाने सोबत आणलेली काड्यापेटी काढली व एक वाळलेलं पान दिलं पेटवून ...ठणठणीत वाळलेलं कोरडं जंगल ते ...आम्ही तिथून निसटायच्या आत आमच्या समोरच धडाधडा आग पेटली . सागवानाची असंख्य वाळलेली पाने डोळ्यादेखत धडाधडा पेटलेली बघून आम्ही रस्त्याकडे पळत सुटलो . रस्त्यापर्यंत येईतोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते व रस्त्यालगतच्या वाळलेल्या पानांपर्यंत ती आग येऊन पोहोचली होती . आम्ही पटापट सायकली काढल्या व टांग टाकून पुसदच्या दिशेने सुसाट सुटलो . आपण भयंकर मोठा आगावपणा केला आहे याची सगळ्यांना खात्री पटलेली . आग जरावेळात शांत होईल याची खात्री होती - तरीही कुणासमोर या गोष्टीची वाच्यता करायची नाही असे ठरवलेले . जरा पुढे येताच घाटात आमच्याच दिशेने वर येणारी पोलिसांची जीप दिसल्यावर मात्र फाटायचीच बाकी राहिलेली . तरीपण थोडं डोकं वापरून विचार केला की पोलिसांचा हा नेहमीच राउंड असणार ते वर येईपर्यंत आपण त्यांना पार करून खाली पोचलेले असू . फक्त कुणी त्यांना पास होताना जंगल - आग - पेटवलं वगैरे शब्द उच्चरायचे नाहीत असं ठरवून आम्ही काही घडलंच नाही अश्या आवेशात गपचूप पुसदला येऊन पोचलो . पुढे बरीच वर्ष तो किस्सा आठवून दात काढत होतो . पण परत असलं काही धतींग करून जंगलांना व जंगलात राहणाऱ्या जीवांना हानी पोचवायची नाही असा निश्चय केला .
सध्या The Kayakers या ग्रुपनी पुणेकरांसाठी Pedal to Kayak हा जबरदस्त उपक्रम आयोजित केलेला आहे . पुण्यातून सायकलवर गेलात तर मोफत कयाकिंग करायला शिकवतात . आम्ही २००४ साली Pedal to Kayak अचानक कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय केलेलं . एकदा कॉलेजला असताना कौतुकला घेऊन पुसदपासून सुमारे २८ km वर असणारं पूस धरण सायकलवर गाठलं . पावसाळ्याचे दिवस सुरु होते व धारण तुडुंब भरलेलं होतं . धरणाच्या पाण्यात थर्माकोल टाकून एक स्थानिक मासेमार झिंगे पकडत होता . नेमका आम्ही तिथे काठावर गेलो असतानाच तो जेवायला म्हणून बाहेर आलेला . तो जेवेपर्यंत त्याचं ते थर्माकोल घेऊन आम्ही आळीपाळीने पाण्यात उतरलो . दोन्ही बाजूने पाय पाण्यात टाकून स्वतःच तोल सावरत हातातल्या दांडक्याने ते वाळवत खोल पाण्यात बऱ्याच आतमध्ये जाऊन आलो . जाताना जराजरा गडबड झाली तरी आपण पाण्यात पडू शकतो हे माहिती होतं . सुदैवानी वारा नसल्यामुळे आम्हीओ दोघेही एत्या जुगाडू कयाक वर बसून कयाकिंग करून आलो . परत आल्यानंतर यथावकाश फोटो आले . फोटो बघितल्यावर भलते साहस केल्याबद्दल मातोश्रींकडून भरपूर बोलणी पण खाल्लेली .

आयुष्यातला पहिला वाहिला Pedal to Kayak चा अनुभव .
मी आणि कौतुक तुडुंब भरलेल्या पूस धरणाजवळ . साल २००४
सायकल ही गोष्ट पाचवीपासून जी अत्यावश्यक झाली ती त्यानंतर नेहमीसाठीच . अकरावीत असताना आईनी पुण्यातून हिरोची Hawk सायकल घेऊन दिली . स्टील बॉडी असलेली बिनागिअरची ती सायकल माझी पहिली रोड बाईक .
अकरावी बारावी ते पुढे MCA होईपर्यंत ती सायकल रगडून वापरली . पुसदला असताना सांडवा मांडवा च्या रस्त्यानी कधी उमरखेड रस्त्याने टेकड्या चढत सायकलने जास्तीत जास्त लांब जाण्यात मजा वाटायला लागलेली होती . पुढे २००६ साली पुणे - बारामती या अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित सायकल स्पर्धेत " Indian Cycle Without Gears " या गटात भाग घेऊन सायकल रेसिंगचा थरार अनुभवला होता . १३८ km चे अंतर वेगात पार करून बारामतीला पोचेपर्यंत अक्षरशः वाट लागलेली. त्यात अनेक राष्ट्रीय सायकलपटूंना बघून व त्यांच्या लै भारी सायकली बघून खूप इंप्रेस झालो होतो . कमवायला लागल्यानंतर स्वकमाईतून चांगली रेसिंग सायकल घ्यायची हे तेव्हाच ठरवले होते . रेस पूर्ण करून लगेच दुसऱ्याच दिवशी पुसदसाठी बस पकडलेली . सायकल बसच्या डिकीत ठेवली होती . प्रचंड थकलो असल्याने सकाळी पुसद कधी येऊन गेलं ते कळलंच नाही . डोळा उघडेपर्यंत सुमारे ७५ km पुढे दारव्हा जवळच्या बोरी-अरब पर्यंत जाऊन पोचलो होतो . मग परत हॅन्डबॅग पाठीवर अडकवून सायकलवर केलेला बोरी -एरव्ही ते दारव्हा असा १० km चा प्रवास - त्यानंतर सिमेंट नेणाऱ्या ट्रकमधून दिग्रस पर्यंत मिळालेली लिफ्ट व परत दिग्रस ते पुसद असा ३० किलोमीटर सायकलवरची रपेट ही पुणे -बारामती रेस इतकीच थरारक होती . दिग्रस वरून पुसदला येताना एका मित्राला- चिक्याला मी सायकलवर हॅन्डबॅग पाठीवर अडकवून येताना दिसलो तेव्हा त्याचे उघडे पडलेले तोंड व बाहेर आलेले डोळे अजूनही लक्षात आहेत .
शिकायला MCA साठी पुण्यात आल्यानंतर सायकलिंग ला भरपूर वाव मिळाला . रोज कॉलेज -क्लास वगैरे साठी सायकल वापल्यामुळे भरपूर सायकलिंग होई व वेगवेगळे रस्ते सुद्धा माहिती होत असत . पुढे जॉब ला लागल्यावर २०१२ साली life cycle कडून घेतलेली Bergamont ची MTB ही माझी स्वकमाईतून घेतलेली पहिली सायकल . त्यावर लांब लांब भटकून झाल्यानंतर व पहिली 200 km ची BRM केल्यानंतर २०१६ ला Cannondale ची रोड बाईक घेतली . त्यावर आता BRM राइड्स व रेसेस जोरात सुरु आहेत .
२०१२ साली life cycle कडून घेतलेली Bergamont ची MTB ,माझी स्वकमाईतून घेतलेली पहिली सायकल .
२०१६ ला घेतलेली Cannondale ची रोड बाईक

yekdam zakas likhan kupach bhawale
ReplyDeleteAwesome.... Sir you experienced a lot in life. Your experience and your blog is awesome. All the best for you future cycle rides.
ReplyDeleteI am happy i have done one trekking with your group.
nicely written :)
ReplyDeletenicely written :)
ReplyDelete