वाढलेले साहसी पर्यटन आणि डोंगरदऱ्यांचे पावित्र्य
गेल्या काही वर्षांत आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन प्रचंड प्रमाणात वाढले आहे आणि यापुढे दर वर्षी ते वाढतच जाणार यात तिळमात्र शंका नाही. त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या रोजगाराच्या दृष्टीने व सदर राज्याच्या आर्थिक बळकटीच्या दृष्टीने नक्कीच चांगली गोष्ट आहे . त्याशिवाय जास्तीत जास्त लोकं यानिमित्ताने आपल्या देशातले विविध भूप्रदेश ,लोकसंस्कृती , खाद्यसंस्कृती , लोककला अनुभवतायत व वातावरण , भाषा , जैवविविधता यातले वेगळेपण अनुभवतायत याचाही आनंदच आहे .
गेल्या वर्ष ४-५ वर्षांत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरताना पर्यटनात झालेली लक्षणीय वाढ मी स्वतः अनुभवली आहे .साहसी पर्यटन सुद्धा याला अपवाद नाही . यापूर्वी देवस्थानं ,तीर्थक्षेत्र व थंड हवेची काही प्रसिद्ध ठिकाणं सोडली तर इतर कित्येक ठिकाणी अत्यंत तुरळक मंडळी दिसायची .गड किल्ल्यांच्या बाबतीत सांगायचं तर जिथे थेट वरपर्यंत गाड्या जाऊ शकतात वा रोप वे आहे असे काही बोटांवर मोजण्यासारखे सिहंगड ,प्रतापगड ,पन्हाळा ,रायगड सारखे किल्ले सोडले तर बाकी ठिकाणी जास्त करून ,गिरीप्रेमी -दुर्गप्रेमी मंडळी व ट्रेकर लोकंच दिसायची .आता मात्र गेल्या २ वर्षांत जवळजवळ सगळ्याच गड किल्ल्यांवर गर्दी वाढलेली दिसली .राजमाची ,कलावंतीण -प्रबळगड ,पेठ चा किल्ला ,विसापूर अश्या हमरस्त्यापासून जवळच असणाऱ्या किल्ल्यांवर गेल्या २ वर्षांत वीकेंड्सला अक्षरशः जत्रा भरलेली दिसली . कात्रज ते सिहंगड , राजगड ते तोरणा असे मोठे ट्रेक्स गेल्या १० वर्षांत मी कैक वेळा केले आहेत . पण २०१६ -१७ मध्ये जितकी गर्दी मला या दोन्ही ट्रेकला दिसली तेव्हढी लोकं गेल्या ९ वर्षांमध्ये मिळून सुद्धा नाही दिसली . अधारबन ,देवकुंड धबधबा , भीमाशंकरच्या जंगलातील वाटा अश्या जागा आत्तापर्यंत हाडाचे ट्रेकर्स व आमच्यासारखे काही उनाड भटके यांच्याव्यतिरिक्त विशेष कुणाला माहिती नव्हत्या व अश्या ठिकाणांवर सुद्धा बरेच ग्रुप्स आलेले दिसतात .पूर्वी अश्या आडवाटेच्या ठिकाणांवर तुमच्या व तुमच्या ग्रुपशिवाय कुणीही दिसत नव्हते. पिण्याचे पाणी ,अन्नपदार्थ वगैरे सगळं स्वतःला पाठीवर वागवावे लागायचं . आता यांपैकी बऱ्याच ठिकाणी पाणी बाटल्या , नाश्ता-जेवण वगैरे सहजासहजी मिळतं .
काही ठिकाणी अचानक वाढलेल्या पर्यटनाला आपले बॉलिवूडचे चित्रपट आणि सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणावर जवाबदार आहे असं माझं निरीक्षण आहे . 'थ्री इडियट्स'मधे दाखवल्या गेल्यानंतर पँगॉंग लेक जबरदस्त लोकप्रिय झालं .आजच्या घडीला तिथे एकावेळी हजारो लोकं राहू शकतील अशी व्यवस्था केली गेली आहे . सिनेमात दाखवलेली तो पिवळी स्कुटरपण तिथे पर्यटकांसाठी आणून ठेवलीय म्हणे . ' ये जवानी है दिवानी' मधे दाखवल्या हिमालयीन ट्रेक नंतर हिमालयात ट्रेकसाठी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले . मनालीजवळच्या बंजारा कॅम्प , गुलाबा, रोहतांग पास, हमटा पास याठिकाणी झुंबड उडू लागली . " चेन्नई एक्सप्रेस' मधे दाखवलेला दूधसागर धबधबा बघून अनेकांनी पावसाळ्यात तिकडे गर्दी करणे पसंत केले . तर व्हाट्सअँप वरून फिरणारे कलावंतीण , सांदण दरी , देवकुंड धबधबा यांच्या व्हिडीओ क्लिप्स बघून तरुणाईची पावलं अश्या दुर्गम ठिकाणी पडू लागली .
देशातली तरुणाई सह्याद्रीच्या - हिमालयाच्या कानाकोपऱ्यात जातेय , तिथली नवनवीन ठिकाणं शोधून काढतेय , तिथलं रौद्र रूप जवळून अनुभवतेय, कधी कडक ऊन कधी बोचरा थंड वारा तर कधी आडवातिडवा कोसळणारा पाऊस दिवसभर तंगडतोड करत वा बाईक-सायकल चालवत अंगावर घ्यायला शिकतेय , तिथलं अप्रतिम सौंदर्य आपल्या मोबाईलमध्ये-कॅमेऱ्यांमध्ये एका वेगळ्या स्तरावर जाऊन साठवतेय हे सगळं एका दृष्टीने नक्कीच सुखावह आहे .
आज हे सगळं लिहिण्याचा हेतू 'पर्यटन वाढले' हे सांगण्याचा नसून ' पर्यटनाबरोबर बेशिस्तपणा - घाण -कचरा करण्याचे प्रमाण व इतर सर्वप्रकारचाच आचरटपणा कमालीचा वाढलेला आहे ' हा आहे .
गेल्या ४-५ वर्षांत सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक व कागदाचा हा कचरा अवाढव्य प्रमाणात वाढलेला दिसतोय . जे फक्त मौज मजा करायला सह्याद्रीत वा हिमालयात जातात त्यांना तो दिसणारसुद्धा नाही पण पर्यावरणाची , गड किल्ल्यांची विशेष काळजी घेणाऱ्या गिरीप्रेमी लोकांना व गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग स्वच्छतेसाठी राबणाऱ्या दुर्गप्रेमींचे साफसफाई मोहिमांचे त्यांनी गोळा केलेला कचऱ्याचे फोटो बघितले तर कदाचित माझं म्हणणं पटेल .
बा रायगड परिवाराचे अमर सोपनर आणि सहकारी किल्ल्यावरच्या दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा गोळा करताना . साभार : अमर सोपनर यांची फेसबुक वॉल
तीच कहाणी हिमालयाची .गेल्या ऑगस्ट महिन्यात हिमालयात सायकलिंगला जाऊन आलो. तिथे हिमालयाच्या दुर्गम भागात पण भरपूर पर्यटन वाढल्याचे दिसले . मनाली- लेह- खारदूंगला या १० दिवसांच्या सायकल मोहिमेत असताना देश विदेशातून आलेले असंख्य बायकर्स दिसले. बुलेटवाल्या लोकांचा तर अक्षरशः सुळसुळाट होता . त्यांच्याशिवाय वेगवेगळ्या आकारांच्या चारचाकींमधून आलेलं पब्लिक पण भरपूर होतं . जून ते सप्टेंबर हा हिमालयात फिरण्यासाठी उत्तम काळ . गर्दी ही असणारच . तरीसुद्धा वाटेवरचे स्थानिक दुकानदार , गाववाली लोकं यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गेल्या ४-५ वर्षांमध्ये पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समजले .
पर्यटन वाढले ही आनंदाचीच गोष्ट . परंतु येणारं बहुसंख्य पब्लिक हे सुशिक्षित असलं तरीही सुसंस्कृत अजिबात नाहीये याची खात्री मनाली -लेह महामार्गावर हजारोंनी पडलेल्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या , वेफर्स- बिस्किटांची वेष्टनं , रेडबुल , फ्रुटी , ट्रॉपिकाना पिऊन रस्तावरच टाकलेले कॅन्स , बियरचा फोडलेल्या बाटल्या इत्यादी कचरा बघून पटली .वाटेत लागणाऱ्या निळ्याशार सुंदर हिमालयीन तळ्यामध्ये पण काही मूर्खांनी टाकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या बघितल्या . सायकलवर हिमालयातले घाट चढताना अक्षरशः इंच न इंच रस्ता तुमच्या डोळ्याखालून जात असतो .त्यावेळी पावलोपावली पडलेला असा कचरा बघून ही असली भिकारड्या मानसिकतेची लोकं डोक्यात जायला लागतात. दररोज शक्य तीथे सायकल थांबवून असे पडलेले कॅन्स ,बाटल्या उचलून माझ्या बॅगमधे घेण्याचे व कँम्पिंगला थांबू त्यावेळी आमच्या गाडीत ठेवण्याचे काम व त्यावेळी तो कचरा करणाऱ्याला मनापासून शिव्या घालण्याचे काम सुद्धा सुरूच होते ......
पाँग च्या घाटात पडलेले रेडबुल चे कॅन
हिमनक ही बॉर्डर रोड अर्गनायझेशन ची हिमालयात रस्ते बनवणारी एक विलक्षण टीम . त्यांनी लिहिलेल्या या लक्ष वेधून घेणाऱ्या बोर्डावरच काही सडक्या मेंदूच्या हरामखोरांनी बिअरची बाटली फोडलेली दिसली .
आपण राहतो त्या ठिकाणांवर म्हणजे आपल्या शहरांमध्ये , गावांमध्ये आधीच आपण भयंकर कचरा करून ठेवलेलेच आहे . आता सह्याद्रीच्या , हिमालयाच्या पर्वतरांगा आपण घाण करायला लागलो आहोत .हे सगळं वेळीच थांबले नाही तर आणखी १०-१५ वर्षातच परिस्थिती भयावह झालेली असणार यात शंका नाही .
स्वच्छता राखण्यासाठी मुद्दाम केले गेलेले संस्कार आणि लहानपणापासून लावलेली शिस्त हे दोन घटक तर महत्त्वाचे आहेतच पण याव्यतिरिक्त ज्याप्रकारे चित्रपट व सोशल मीडिया ही माध्यमं पर्यटन वाढण्यास कारणीभूत ठरली त्याचप्रमाणे त्याच माध्यमांचा उपयोग जनजागृतीसाठी प्रभावीपणे केला जाऊ शकतो . नुकताच दुर्गसंवर्धन या विषयावर असलेला " बघतोस काय मुजरा कर" या नावाचा एक मराठी चित्रपट येऊन गेला . भारतीय लोकांवर चित्रपटांचा प्रचंड प्रभाव असतो हे जगजाहीर आहे . एखाद-दुसऱ्या हिंदी चित्रपटात आमिर / रणबीर अथवा गेलाबाजार सलमान खान लोकांना पर्यटनाला डोंगर दऱ्यांमध्ये गेल्यावर कचरा करू नका वगैरे डोस देताना दिसला अथवा रणवीर - दीपिका एखाद्या बुलेटवरून हिमालयात फिरताना लोकांनी टाकलेला कचरा आपल्या बॅगमधे उचलून टाकताना व त्यासोबत काही खरमरीत डायलॉग बोलताना दिसले तर आपल्या कॉपीकॅट सुशिक्षित अडाणी प्रेक्षकांवर थोडाफार प्रभाव नक्कीच पडू शकतो . ज्या वेगाने आपण सांदण दरीचे - देवकुंड धबधब्याचे , कलावंतिणीचा सुळक्याचे ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेले HD व्हिडीओ व्हाट्सअँपवर , फेसबुकवर शेअर करतो त्याप्रमाणेच थोडे प्रबोधनात्मक , गड किल्ले साफ करतानाचे , हिमालयातील सुंदर नितळ तलावांमधून प्लास्टिक बाहेर काढतानाचे HD व्हिडीओ पण शेअर करायला सुरु करू . कुठेही ट्रेक ला जाताना एखादी मोठी पिशवी अथवा पोते आपल्या ग्रुपचा कचरा टाकायला व त्याठिकाणी पडलेला कचरा उचलून आणायला सोबत घेऊ शकतो .
आज ११ डिसेंबर , जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने खालील ३ गोष्टी करण्याचा निश्चय करूया .
१. निसर्गात असताना स्वतःकडून कुठल्याही प्रकारचा अनैसर्गिक कचरा होणार नाही याची दक्षता घ्यायची.
२. इतरांना कचरा करण्यापासून रोखायचे
३. इतरांनी केलेला कचरा शक्य तेव्हा शक्य होईल तसा गोळा करून योग्य जागी त्याची विल्हेवाट लावायची . त्यासाठी कुठलीही लाज बाळगायची नाही .
--- ©अद्वैत पराग खटावकर
गेल्या काही वर्षांत आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन प्रचंड प्रमाणात वाढले आहे आणि यापुढे दर वर्षी ते वाढतच जाणार यात तिळमात्र शंका नाही. त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या रोजगाराच्या दृष्टीने व सदर राज्याच्या आर्थिक बळकटीच्या दृष्टीने नक्कीच चांगली गोष्ट आहे . त्याशिवाय जास्तीत जास्त लोकं यानिमित्ताने आपल्या देशातले विविध भूप्रदेश ,लोकसंस्कृती , खाद्यसंस्कृती , लोककला अनुभवतायत व वातावरण , भाषा , जैवविविधता यातले वेगळेपण अनुभवतायत याचाही आनंदच आहे .
गेल्या वर्ष ४-५ वर्षांत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरताना पर्यटनात झालेली लक्षणीय वाढ मी स्वतः अनुभवली आहे .साहसी पर्यटन सुद्धा याला अपवाद नाही . यापूर्वी देवस्थानं ,तीर्थक्षेत्र व थंड हवेची काही प्रसिद्ध ठिकाणं सोडली तर इतर कित्येक ठिकाणी अत्यंत तुरळक मंडळी दिसायची .गड किल्ल्यांच्या बाबतीत सांगायचं तर जिथे थेट वरपर्यंत गाड्या जाऊ शकतात वा रोप वे आहे असे काही बोटांवर मोजण्यासारखे सिहंगड ,प्रतापगड ,पन्हाळा ,रायगड सारखे किल्ले सोडले तर बाकी ठिकाणी जास्त करून ,गिरीप्रेमी -दुर्गप्रेमी मंडळी व ट्रेकर लोकंच दिसायची .आता मात्र गेल्या २ वर्षांत जवळजवळ सगळ्याच गड किल्ल्यांवर गर्दी वाढलेली दिसली .राजमाची ,कलावंतीण -प्रबळगड ,पेठ चा किल्ला ,विसापूर अश्या हमरस्त्यापासून जवळच असणाऱ्या किल्ल्यांवर गेल्या २ वर्षांत वीकेंड्सला अक्षरशः जत्रा भरलेली दिसली . कात्रज ते सिहंगड , राजगड ते तोरणा असे मोठे ट्रेक्स गेल्या १० वर्षांत मी कैक वेळा केले आहेत . पण २०१६ -१७ मध्ये जितकी गर्दी मला या दोन्ही ट्रेकला दिसली तेव्हढी लोकं गेल्या ९ वर्षांमध्ये मिळून सुद्धा नाही दिसली . अधारबन ,देवकुंड धबधबा , भीमाशंकरच्या जंगलातील वाटा अश्या जागा आत्तापर्यंत हाडाचे ट्रेकर्स व आमच्यासारखे काही उनाड भटके यांच्याव्यतिरिक्त विशेष कुणाला माहिती नव्हत्या व अश्या ठिकाणांवर सुद्धा बरेच ग्रुप्स आलेले दिसतात .पूर्वी अश्या आडवाटेच्या ठिकाणांवर तुमच्या व तुमच्या ग्रुपशिवाय कुणीही दिसत नव्हते. पिण्याचे पाणी ,अन्नपदार्थ वगैरे सगळं स्वतःला पाठीवर वागवावे लागायचं . आता यांपैकी बऱ्याच ठिकाणी पाणी बाटल्या , नाश्ता-जेवण वगैरे सहजासहजी मिळतं .
काही ठिकाणी अचानक वाढलेल्या पर्यटनाला आपले बॉलिवूडचे चित्रपट आणि सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणावर जवाबदार आहे असं माझं निरीक्षण आहे . 'थ्री इडियट्स'मधे दाखवल्या गेल्यानंतर पँगॉंग लेक जबरदस्त लोकप्रिय झालं .आजच्या घडीला तिथे एकावेळी हजारो लोकं राहू शकतील अशी व्यवस्था केली गेली आहे . सिनेमात दाखवलेली तो पिवळी स्कुटरपण तिथे पर्यटकांसाठी आणून ठेवलीय म्हणे . ' ये जवानी है दिवानी' मधे दाखवल्या हिमालयीन ट्रेक नंतर हिमालयात ट्रेकसाठी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले . मनालीजवळच्या बंजारा कॅम्प , गुलाबा, रोहतांग पास, हमटा पास याठिकाणी झुंबड उडू लागली . " चेन्नई एक्सप्रेस' मधे दाखवलेला दूधसागर धबधबा बघून अनेकांनी पावसाळ्यात तिकडे गर्दी करणे पसंत केले . तर व्हाट्सअँप वरून फिरणारे कलावंतीण , सांदण दरी , देवकुंड धबधबा यांच्या व्हिडीओ क्लिप्स बघून तरुणाईची पावलं अश्या दुर्गम ठिकाणी पडू लागली .
देशातली तरुणाई सह्याद्रीच्या - हिमालयाच्या कानाकोपऱ्यात जातेय , तिथली नवनवीन ठिकाणं शोधून काढतेय , तिथलं रौद्र रूप जवळून अनुभवतेय, कधी कडक ऊन कधी बोचरा थंड वारा तर कधी आडवातिडवा कोसळणारा पाऊस दिवसभर तंगडतोड करत वा बाईक-सायकल चालवत अंगावर घ्यायला शिकतेय , तिथलं अप्रतिम सौंदर्य आपल्या मोबाईलमध्ये-कॅमेऱ्यांमध्ये एका वेगळ्या स्तरावर जाऊन साठवतेय हे सगळं एका दृष्टीने नक्कीच सुखावह आहे .
आज हे सगळं लिहिण्याचा हेतू 'पर्यटन वाढले' हे सांगण्याचा नसून ' पर्यटनाबरोबर बेशिस्तपणा - घाण -कचरा करण्याचे प्रमाण व इतर सर्वप्रकारचाच आचरटपणा कमालीचा वाढलेला आहे ' हा आहे .
सह्याद्रीच्या डोंगरांवर साठत जाणारा कचरा
गेल्या ४-५ वर्षांत सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक व कागदाचा हा कचरा अवाढव्य प्रमाणात वाढलेला दिसतोय . जे फक्त मौज मजा करायला सह्याद्रीत वा हिमालयात जातात त्यांना तो दिसणारसुद्धा नाही पण पर्यावरणाची , गड किल्ल्यांची विशेष काळजी घेणाऱ्या गिरीप्रेमी लोकांना व गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग स्वच्छतेसाठी राबणाऱ्या दुर्गप्रेमींचे साफसफाई मोहिमांचे त्यांनी गोळा केलेला कचऱ्याचे फोटो बघितले तर कदाचित माझं म्हणणं पटेल .
Let's recognize our heroes चे शिलेदार विक्रांत सिंग आणि सहकारी देवकुंड धबदब्याच्या मार्गावरून कचरा गोळा करून आणताना .
बा रायगड परिवाराचे अमर सोपनर आणि सहकारी किल्ल्यावरच्या दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा गोळा करताना . साभार : अमर सोपनर यांची फेसबुक वॉलतीच कहाणी हिमालयाची .गेल्या ऑगस्ट महिन्यात हिमालयात सायकलिंगला जाऊन आलो. तिथे हिमालयाच्या दुर्गम भागात पण भरपूर पर्यटन वाढल्याचे दिसले . मनाली- लेह- खारदूंगला या १० दिवसांच्या सायकल मोहिमेत असताना देश विदेशातून आलेले असंख्य बायकर्स दिसले. बुलेटवाल्या लोकांचा तर अक्षरशः सुळसुळाट होता . त्यांच्याशिवाय वेगवेगळ्या आकारांच्या चारचाकींमधून आलेलं पब्लिक पण भरपूर होतं . जून ते सप्टेंबर हा हिमालयात फिरण्यासाठी उत्तम काळ . गर्दी ही असणारच . तरीसुद्धा वाटेवरचे स्थानिक दुकानदार , गाववाली लोकं यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गेल्या ४-५ वर्षांमध्ये पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समजले .
पर्यटन वाढले ही आनंदाचीच गोष्ट . परंतु येणारं बहुसंख्य पब्लिक हे सुशिक्षित असलं तरीही सुसंस्कृत अजिबात नाहीये याची खात्री मनाली -लेह महामार्गावर हजारोंनी पडलेल्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या , वेफर्स- बिस्किटांची वेष्टनं , रेडबुल , फ्रुटी , ट्रॉपिकाना पिऊन रस्तावरच टाकलेले कॅन्स , बियरचा फोडलेल्या बाटल्या इत्यादी कचरा बघून पटली .वाटेत लागणाऱ्या निळ्याशार सुंदर हिमालयीन तळ्यामध्ये पण काही मूर्खांनी टाकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या बघितल्या . सायकलवर हिमालयातले घाट चढताना अक्षरशः इंच न इंच रस्ता तुमच्या डोळ्याखालून जात असतो .त्यावेळी पावलोपावली पडलेला असा कचरा बघून ही असली भिकारड्या मानसिकतेची लोकं डोक्यात जायला लागतात. दररोज शक्य तीथे सायकल थांबवून असे पडलेले कॅन्स ,बाटल्या उचलून माझ्या बॅगमधे घेण्याचे व कँम्पिंगला थांबू त्यावेळी आमच्या गाडीत ठेवण्याचे काम व त्यावेळी तो कचरा करणाऱ्याला मनापासून शिव्या घालण्याचे काम सुद्धा सुरूच होते ......
पाँग च्या घाटात पडलेले रेडबुल चे कॅन
हिमनक ही बॉर्डर रोड अर्गनायझेशन ची हिमालयात रस्ते बनवणारी एक विलक्षण टीम . त्यांनी लिहिलेल्या या लक्ष वेधून घेणाऱ्या बोर्डावरच काही सडक्या मेंदूच्या हरामखोरांनी बिअरची बाटली फोडलेली दिसली .
आपण राहतो त्या ठिकाणांवर म्हणजे आपल्या शहरांमध्ये , गावांमध्ये आधीच आपण भयंकर कचरा करून ठेवलेलेच आहे . आता सह्याद्रीच्या , हिमालयाच्या पर्वतरांगा आपण घाण करायला लागलो आहोत .हे सगळं वेळीच थांबले नाही तर आणखी १०-१५ वर्षातच परिस्थिती भयावह झालेली असणार यात शंका नाही .
स्वच्छता राखण्यासाठी मुद्दाम केले गेलेले संस्कार आणि लहानपणापासून लावलेली शिस्त हे दोन घटक तर महत्त्वाचे आहेतच पण याव्यतिरिक्त ज्याप्रकारे चित्रपट व सोशल मीडिया ही माध्यमं पर्यटन वाढण्यास कारणीभूत ठरली त्याचप्रमाणे त्याच माध्यमांचा उपयोग जनजागृतीसाठी प्रभावीपणे केला जाऊ शकतो . नुकताच दुर्गसंवर्धन या विषयावर असलेला " बघतोस काय मुजरा कर" या नावाचा एक मराठी चित्रपट येऊन गेला . भारतीय लोकांवर चित्रपटांचा प्रचंड प्रभाव असतो हे जगजाहीर आहे . एखाद-दुसऱ्या हिंदी चित्रपटात आमिर / रणबीर अथवा गेलाबाजार सलमान खान लोकांना पर्यटनाला डोंगर दऱ्यांमध्ये गेल्यावर कचरा करू नका वगैरे डोस देताना दिसला अथवा रणवीर - दीपिका एखाद्या बुलेटवरून हिमालयात फिरताना लोकांनी टाकलेला कचरा आपल्या बॅगमधे उचलून टाकताना व त्यासोबत काही खरमरीत डायलॉग बोलताना दिसले तर आपल्या कॉपीकॅट सुशिक्षित अडाणी प्रेक्षकांवर थोडाफार प्रभाव नक्कीच पडू शकतो . ज्या वेगाने आपण सांदण दरीचे - देवकुंड धबधब्याचे , कलावंतिणीचा सुळक्याचे ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेले HD व्हिडीओ व्हाट्सअँपवर , फेसबुकवर शेअर करतो त्याप्रमाणेच थोडे प्रबोधनात्मक , गड किल्ले साफ करतानाचे , हिमालयातील सुंदर नितळ तलावांमधून प्लास्टिक बाहेर काढतानाचे HD व्हिडीओ पण शेअर करायला सुरु करू . कुठेही ट्रेक ला जाताना एखादी मोठी पिशवी अथवा पोते आपल्या ग्रुपचा कचरा टाकायला व त्याठिकाणी पडलेला कचरा उचलून आणायला सोबत घेऊ शकतो .
आज ११ डिसेंबर , जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने खालील ३ गोष्टी करण्याचा निश्चय करूया .
१. निसर्गात असताना स्वतःकडून कुठल्याही प्रकारचा अनैसर्गिक कचरा होणार नाही याची दक्षता घ्यायची.
२. इतरांना कचरा करण्यापासून रोखायचे
३. इतरांनी केलेला कचरा शक्य तेव्हा शक्य होईल तसा गोळा करून योग्य जागी त्याची विल्हेवाट लावायची . त्यासाठी कुठलीही लाज बाळगायची नाही .
--- ©अद्वैत पराग खटावकर

अप्रतिम लीखाण
ReplyDeleteधन्यवाद भाऊ
Deleteछान लिहिले आहेस मित्रा!
ReplyDelete- सचिन राठोड
धन्यवाद :-)
Delete